राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

93

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री श्री. जयंत पाटील मंंगळवार, 30 ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येेत आहेत. या दौऱ्यात ते उद्या सकाळी 9 वाजता चंद्रपूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील व 10.30 वाजता गडचिरोली येथे आगमन. सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी बैैठक व जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैैठक घेतील. दुपारी 2 ते 3 राखीव राहील व दुपारी 3 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील. तरी प्रदेश पदाधिकारी, सदस्य, जिल्हा कार्यकारिणी पदधिकारी, सदस्य, फ्रंन्टल व सेल विभागाचे सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा पदाधिकरी, कार्यकर्ते या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय, राधे बिल्डीग जवळ, चामोर्शी रोड गडचिरोली येथे उपस्थित राहावेे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.