केंद्र सरकारचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडून गडचिरोली येथे नोंदविला निषेध

73

– बिलकिस वानोच्या बलात्काऱ्यांना पुन्हा गजाआड करण्याची केली मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : बिलकिस वानोच्या बलात्काऱ्यांची गुजरात सरकारने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी सुटका केली असून त्यांना पुन्हा गजाआड करण्यात यावे या मागणीसाठी स्थानिक इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
२००२ मध्ये गुजरातमध्यये जो नरसंहार झाला त्यापैकी बिलकिस वानो एक शिकार असून तिच्यावर ११ जणांनी सामूहिक बलात्कार केला. तिच्या तीन वर्षांंच्या चिमुकल्या मुलीचा खून करून अवघे कुटुंब संपवीले. परंतु हिम्मत न हारता बिलकिस वानोने प्रदिर्घ न्यायालयीन लढा दिला. मुंबईमध्ये विशेष सीबीआय न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बिलकिसला न्याय मिळाला असे वाटत होते. परंतु देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल ‍किल्यावरून केलेल्या भाषणात महिलांच्या सन्मानाच्या घोषणा सायंकाळपर्यंत हवेतच विरळून गेल्या आणि गुजरात सरकाने बिलकिस वानोच्या ११ बलात्काऱ्यांची नियमबाहृय सुटका केली. हे कृत्य केवळ असंविधानिकच नाही तर मानवतेला काळीमा फासणारे असून न्यायीक व्यवस्थेच्या चिंधळ्या उडवणारे आहे.
बलात्काऱ्यांची सुटका करण्याची नियमांमध्ये कुठलीही तरतूद नसताना गुजरात सरकारने हा निर्णय घेतला. या संदर्भात केंद्र सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
यावेळी विभागीय महिला अध्यक्षा शाहीन हकीम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, गडचिरोली शहर अध्यक्ष तथा नगर परिषदेचे माजी सभापती विजय गोरडवार, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, जिल्हा उपाध्यक्ष फहीमभाई काजी, जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, शहर अध्यक्ष मिनल चिमुरकर, तालुका महिला अध्यक्ष निता सुरेश बोबाटे, शहर कार्याध्यक्ष कपील बागडे, आरती कोल्हे, संध्या उईके, सुवर्णा पवार, मनीषा खेवले, ममता चिलबुले, अनिता कोलते, अज्जू पठाण, बेबीताई लाभान, चेतना मेश्राम आदी उपस्थित होते.