3 जहाल नक्षलींना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

363

– शासनाने जाहीर केले होते 10 लाख रुपयांचे बक्षीस

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत येणा­ऱ्या पोमके लाहेरी हद्दीतील मौजा कोयार जंगल परीसरात गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक (सी-60) व सीआरपीएफ बटालियन 37 चे जवान संयुक्त नक्षल विरोधी अभियान राबवित असताना 2 जहाल नक्षलवाद्यांना अटक तसेच उपविभाग हेडरी अंतर्गत पोमके गट्टा (जां) हद्दीतील मौजा झारेवाडा जंगल परीसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना 1 जहाल नक्षलवाद्यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाचे जवानांना यश प्राप्त झाले आहे.
सदर नक्षलवाद्यांना दोन वेगवेगळया घटनांमध्ये अटक करण्यात आले असून, मौजा कोयार जंगल परीसरामध्ये अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये रमेश पल्लो वय -29 वर्ष रा. कोयार ता. भामरागड, तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी वय – 23 वर्ष रा. पद्दुर ता. भामरागड जि. गडचिरोली यांचा समावेश असून, मौजा झारेवाडा जंगल परिसरामध्ये अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे वय 27 वर्ष रा. झारेवाडा ता. एटापल्ली याचा समावेश आहे.

अटक केलेल्या सदस्यांमधील रमेश पल्लो हा सन 2019 मध्ये भरती होवुन कंपनी 10 चा अॅक्शन टिम मेंबर व स्कॉऊट टिम मेंबर म्हणुन कार्यरत होता. सद्या सन 2021-22 मध्ये तो स्कॉऊट टिम मेंबर म्हणुन कार्यरत होता. त्याचा 3 खून, 8 चकमक, 1 जाळपोळ, 1 इतर अशा एकूण 13 गुन्ह्रांंमध्ये समावेश आहे.
तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी ही सन जुलै 2015 मध्ये ती नक्षलमध्ये भरती झाली. सन 2016 ते 2019 पर्यंत ती प्लाटुन क्र 7 मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.
3) सन 2019 ते आतापर्यंत ती कंपनी क्र. 10 मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिचा 4 खून व 03 चकमक अशा एकुण 07 गुन्ह्रामध्ये समावेश आहे.
अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे हा सन 2010 साली पेरमिली दलम सदस्य पदावर भरती होवुन 2013 पर्यंत कार्यरत होता. सन 2013 पासुन प्लॉटुन क्र. 14 मध्ये कार्यरत होता. ऑगस्ट 2013 मध्ये सिरोंचा दलममध्ये बदली होवुन 2018 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होता. मे 2018 पासुन ते आजपर्यत तो भामरागड दलममध्ये कार्यरत होता. त्याचा 7 खून, 9 चकमक, 2 जाळपोळ, 2 दरोडा, 1 जबरी चोरी व इतर 3 अशा एकुण 24 गुन्हयांंमध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले बक्षीस
1) रमेश पल्लो याच्यावर 4 लक्ष रूपये. 2) तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी हिच्यावर 4 लक्ष रूपये. 3) अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे याचेवर 2 लक्ष रूपये बक्षिस जाहीर करण्यात आले होते.

गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे सन 2021-22 या दोन वर्षाच्या कालावधीत आतापर्यंत एकुण 57 जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे, मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडली.
मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.