लांजेडा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

101

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : लांजेडा येथे काल, 27 ऑगस्ट रोजी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या तान्हा पोळ्यात शेकडो बाल गोपालांनी विविध प्रकारच्या वेशभूषा साकारुन सहभाग नोंदविला. यामध्ये देशातील ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला होता. यात पूरपरिस्थितीने हैरान शेतकरी, महागाईने होरपळलेली जनता, शेतकरी जीवनशैली सांगणारी झाकी, आत्महत्त्या करु नका असे संदेश देणारे फलक, स्वच्छतेची कास धरा म्हणणारे फलक, अशी अनेक वेशभुषा या बालगोपालांनी साकारली होती.

या बाल गोपालांचे कौतुक व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. महेन्द्र ब्राम्हणवाडे यांनी या तान्हा पोळ्याला भेट दिली व आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी प्रा. श्री. देवानंदजी कामडी, श्री. जितेंद्र पा. मुनघाटे, श्री. संजय चन्ने, कुकुडकर, रुपेश टिकले, योगेश नैताम, सुरज मडावी व गावकरी बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.