विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे, संस्कृतीचे रक्षण करणे, त्यांचा जल-जंगल आणि जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा, त्यांची विशिष्ट संस्कृती ओळख हक्क झाणि अधिकाराची ओळख सामाजिक ऐक्य अस्तिव, कायम राहावी यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांनी आवश्यकत्ता लक्षात घेवून संयुक्त राष्ट्रसंघाकडून जागतिक आदिवासी दिवस दरवर्षी साजरा केला जातो. याच धर्तीवर 9 आगष्ट 2022 रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेशियन स्कूल अहेरी येथे जागतिक आदिवासी दिन आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
‘एक तीर, एक कमान, सारे आदिवासी एक समान, तसेच जय सेवा, सेवा सेवा, आमची संस्कृती, आमचा अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान’ या गगनभेदीच्या गर्जनेने कार्यक्रम दुमदुमला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. वरून उखर्डे, मुख्य अतिथी म्हणुन शा. व्य. स अध्यक्ष प्रदिपजी सडमेक, शा. व्य. स. सदस्य प्रदीप तलांडे, लक्ष्मी कुमरे, चंद्रु कुक्काला, अरुणा आत्राम, अनंतकुमार आलाम, संदीप दोडके, तसेच लेखाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी श्री शरद चौधरी यांच्या हस्ते क्रांतीविर बिरसामुंडा, विर बाबुराव शेडमाके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस पूजन व माल्यार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदनपर भाष्य करताना शा. व्य. स. अध्यक्ष यांनी गोंडी भाषेत भाषण दिले. यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या माध्यमातुन चांगले शिक्षण घेवून यशाचा किनारा गाठावा, हताश न होता अभ्यास करित राहावे, सोबतच समाजाचा विकास घडविणे या बाबीकडे लक्षकेंद्रीत असणे असे त्यांनी अध्यक्षीय भाषणात आपले मत व्यक्त केले. त्यांनतर एकलव्य मॉडेल रेसिडेशियन स्कूल अहेरी प्राचार्य श्री. वरुन उखर्डे यांनी सर्वप्रथम जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व पालक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. एकलव्य शाळेच्या माध्यमाने चांगले शिक्षण घेवून महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा व राज्यसेवा परिक्षेची तयारी करावी तसेच जागतिक आदिवासी दिवस आपणासाठी खूप महत्वपूर्ण आहे. आज भारताचे प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती महामहिम आदिवासी भगिनी कार्यरत आहेत, असे त्यांनी यावेळी भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांचे भाषण झाले. लगेच सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी पारंपारिक वेशभुषात रेला नृत्य व सामुहीक नृत्य, गायन स्पर्धा, स्वच्छतेवर नाटयछटा सादरीकरण करण्यात आले. इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या उतीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तु देवून गौरवण्यात आले व पुढिल त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्री. गंगातिरे, श्री. माने, श्री सुशील हुलके, श्री. साबळे, श्री. बोरसे, श्री. समर्थ, मोईन, सौ. मनीषा मुडपल्लीवार, सौ. तेजा मेश्राम, सौ. झिनत शेख, सौ. पारधी, सौ. बनाइत, सौ. सल्लावार, सौ. तागडे, तसेच शिक्षकवृंद,इतर कर्मचारी, पालकवर्ग शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पायल पेंदाम, उज्ज्वल गौतम यांनी तर आभार प्रदर्शन जीवन शिडाम यांनी केले. सर्वांच्या सहयोगाने हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.