भाजपा महिला मोर्चातर्फे गडचिरोली येथील साई मंदिरात “राखी मेकिंग व निबंध स्पर्धा’ संपन्न

112

– 28 शाळेतील 58 विद्यार्थ्यांनी घेतला स्पर्धेत भाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली भाजपा महिला मोर्चातर्फे भाजपा प्रदेश सदस्य रेखाताई डोळस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली येथील साई मंदिरात “रक्षा बंधन” सणानिमित्त 5 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता नवनविन राखी मेकिंग व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
प्रास्ताविक भाषणात रेखाताई डोळस म्हणाल्या, भाजपा महिला मोर्चातर्फे पहिल्यांदाच राखी सणाबाबत नवनवीन राखी मेकिंग व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत 28 शाळेतील 58 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. राखी मेकिंग स्पर्धेत लक्की चापले याने प्रथम बक्षीस मिळविले असून द्वितीय, तृतीय बक्षीसासह 4 विद्यार्थ्यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. तर निबंध स्पर्धेत प्रणव गड्डमवार याने प्रथम बक्षीस मिळविले, द्वितीय, तृतीय बक्षीसासह 6 प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. दोन्ही स्पर्धेतेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना पेन संच असे प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. दर वर्षाला असा कार्यक्रम घेतला जाईल, असे त्या म्हणाल्या.
राखी मेकिंग व निबंध स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे यांंनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दै. सकाळ जिल्हा प्रतिनिधी मिलिंदजी उमरे हे होते. प्रमुख अतिथी भाजपा STM महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (संघटन) प्रकाश गेडाम होते. यावेळी मंचावर ता. संपर्क प्रमुख विलास पाटील भांडेकर, गीताताई हिंगे, माजी जि. प. सभापती रंजीताताई कोडाप, वच्छलाताई मुनघाटे, माजी जि. प. सदस्य लताताई पुंगाटी, पुलखलच्या उपसरपंच रुमनताई ठाकरे, सलीमभाई, प्रिती कातरकर, मुजुमदार, पुष्पाताई करकाडे, अली मॅडम, पठाण मॅडम, श्रीकांतजी कातरकर, रमेशजी डोळस, माजी नगरसेविका रितुताई कोलते, माजी नगरसेविका वर्षा नैताम, बोरकुटेजी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.