भाजयुमोतर्फे स्वातंत्र्याच्या अमॄत महोत्सवानिमित्त आज भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन

26

– 75 किमीची रॅली ; 75 मोटारसायकल व 75 युवकांचा राहणार सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने शनिवार, 13 ऑगस्ट रोजी 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली 75 किलोमीटरवरून काढण्यात येणार असून यात 75 मोटारसायकल व 75 युवकांचा सहभाग राहणार आहे.
या रॅलीला गणेश भात गिरणी बाजार चौक धानोरा येथून सकाळी प्रारंभ होणार असून दुपारी 12 वाजता एस. ओ. एस. स्कूल समोर धानोरा रोड गडचिरोली व दुपारी 4 वाजता लक्ष्मी गेट चौक मेन रोड चामोर्शी या मार्गाने ही रॅली मार्गक्रमण करणार आहे. चामोर्शी शहरातील रॅलीचे नेतृत्व आशीष पिपरे व रमेश अधिकारी हे करणार आहेत. या रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी व युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.