विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : मधुकरजी भांडेकर मित्र परिवार व स्पंदन फाऊंंडेशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ऑगस्ट रोजी मधुकरजी भांडेकर यांंच्याकडून जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा कुरुड व ग्रामपंचयात कार्यालय कुरुड यांंना भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांंचा फोटो भेट देण्यात आले.
यावेळी मधुकरजी भांडेकर, कुरूडचे सरपंच विनोदजी मडावी, उपसरपंच बाबुरावजी शेंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद शाळा कुरुडचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.