गडचिरोली येथे मंगळवारी जागतिक मुलनिवासी (आदिवासी) दिवस समारोहाचे आयोजन

41

– आदिवासी गुणवंत विद्यार्थी, शासन पुरस्कार प्राप्त आदिवासी व्यक्ती, सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आदिवासी समाजातील नागरिकांचा सत्कार व समाज प्रबोधन कार्यक्रम होणार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हा गडचिरोली व इतर विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता येथील आरमोरी मार्गावरील संस्कृती सांस्कृतिक भवनात जागतिक मुलनिवासी (आदिवासी) दिवस समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आदिवासी गुणवंत विद्यार्थी, शासन पुरस्कार प्राप्त आदिवासी व्यक्ती, सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आदिवासी समाजातील नागरिकांचा सत्कार व समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक गडचिरोली जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अध्यक्ष म्हणून जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय नांदेडचे सहयोगी प्राध्यापक तथा आदिवासी कंवर समाजाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. मेघराज कपूर तर मुख्य मार्गदर्शक म्हणून गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अंकित, गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, नागपूरचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू राजगडकर, अनिरुद्ध करिअर अकॅडमी गडचिरोलीचे संचालक गणेश कोवे, ध्वजारोहक म्हणून अ. भा. आदिवासी विकास परिषद नागपूरचे विदर्भ उपाध्यक्ष घनश्यामजी मडावी, स्वागताध्यक्ष म्हणून ऑ. इं. आ. ए. फेडरेशन नागपूरचे विभागीय अध्यक्ष माधवराव गावळ तर प्रमुख अतिथी म्हणून सा. बां. विभाग गडचिरोली शालीक उसेंडी, पोलिस स्टेशन गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम, बँक ऑफ इंडिया गडचिरोलीचेशाखा व्यवस्थापक कैलास मडावी, ऑ. इं. आ. ए. फेडरेशनचे अध्यक्ष भरत येरमे, कै. बाबुराव मडावी स्मारक समिती गडचिरोलीचे अध्यक्ष गुलाबराव मडावी, अ. भा. आदिवासी विकास परिषद नागपूरचे विदर्भ सचिव योगानंद ऊईके, स्व. क्रांतिवीर नारायणसिंह ऊईके संघर्ष समितीचे अध्यक्ष वनिश्याम येरमे, आदिवासी विकास परिषद महिला आघाडी अध्यक्ष वर्षाताई शेडमाके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 8 वाजता 45 जमाती समाज भवन नियोजित जागेवर धनश्यामजी मडावी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर 10 वाजता कै. बाबुराव मडावी चौक ते कार्यक्रम स्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधव व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.