खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या हस्ते नारायणी खटी हिचा सत्कार

170

– सीबीएसई 10 च्या परीक्षेत मिळविले 93 टक्के गुण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष श्री. भारत खटी यांची मुलगी नारायणी भारत खटी हिने C.B.S.E. 10 वी बोर्डाच्या परिक्षेत प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलमधून 93 % टक्के गुण प्राप्त करुन 7 वा क्रमांक पटकावला. याबद्दल गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केेला व अभिनंदन केले.

यावेळी नारायणी हिच्याशी चर्चा केली असता पुढे NEET ची परिक्षा उत्तीर्ण करुन मला डॉक्टर व्हायला आवडेल, अशी प्रतीकिया व्यक्त केली असता खासदार साहेबांनी भविष्याच्या वाटचालीकरिता तिला शुभेच्छा दिल्या.