कारगिल युद्धामध्ये बलिदान देणाऱ्या विर जवानांचा अभिमान : माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे

50

– शहरातील कारगिल चौक येथे प्राणाची आहुती देणाऱ्या विर जवानांना केले अभिवादन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सन १९९९ मध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान कारगिल युद्धामध्ये भारताच्या शुर सैनिकांनी कारगिल द्रास भागातील पाकिस्तानी हल्लेखोरांनी ताब्यात घेतलेला भाग पुन्हा ताब्यात घेतला. पाकिस्तानी घुसखोर दहशतवादी आणि सैनिकांना कारगिलमधून हुसकावून लावले. युद्धादरम्यान ३००० हुन अधिक पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी मारले. मातृभूमीचे रक्षण करतांना ५००हुन अधिक भारतीय जवानांनी बलिदान दिले. या ऑपरेशन विजयमध्ये बलिदान देणाऱ्या वीर जवानांचा अभिमान आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी केले.
आज कारगिल विजय दिवसानिमित्त गडचिरोली शहरातील कारगिल चौक येथे प्राणाची आहुुती देणाऱ्या वीर जवानांना दिप प्रज्वलित व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष बोलत होत्या.
यावेळी न. प. मुख्याधिकारी विशाल वाघ, भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, गोविंद सारडा, सुनीलजी मेहर, डॉ. बिडकर, महेंद्र वाघमारे, देशमुख, राजेंद्र साळवे, अंकुश भालेराव, वासुदेव बट्टे, विलास नैताम, सोनटक्के, आशिष पठाण, सुनील बावणे, प्रफुल आंबोरकर, नरेंद्र चन्नावार, प्रकाश भांडेकर, विवेक बैस उपस्थित होते.