आलापल्ली येथील पूरग्रस्तांना मा. जि. परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

62

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आलापल्ली येथील वॉर्ड क्र.६ मध्ये पूर आल्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. गेल्या दोन दिवसांंपासून राज्यात सतत पाऊस सुरू असून अनेक गावांना पुराच्या पठका बसला आहे. अहेरी तालुक्यात सर्वात जास्त गावात पुराच्या फटका बसला असून अनेक गावांचा सम्पर्क तुटला आहे. अहेरी जवळील आलापल्ली येथे पण पुराच्या फटका बसला असून काही घरात पाणी शिरले असल्याने त्यांच्या सामुग्रीच्या नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी आल्लापली येतील पूरग्रस्त कुटुंबाची भेट घेवुन आर्थिक मदत केले. मदत कार्य बानूबाई आत्राम, सुरेखा सन्ड्रा, रामबाई सिगनेर, नागणा रामगिरीवार, अनिल बोलेम यांना करण्यात आले. यावेळी जूलेख शेख, विजय बोमनवार, गटया बुसावार, पेंटया मुडसुवार, शंकर जगीडवार, शायलू दुपमवार, रामया बोमनवार, राजणा मेकलवार, शंकर आत्राम, बोरकुटे, मोंडी येरावार आदी उपस्थित होते.