मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा सत्कार

204

– संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आमदार महोदयांचे अभिनंदन

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नाला यश

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांचेसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेही मानले आभार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने गडचिरोली येथे अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) मंजूर झाले. मेडीकल कॉलेजला मंजुरी देण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून गडचिरोली येथे मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्याबद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार डॉ देवरावजी होळी यांचे अभिनंदन करीत सत्कार केला.
या सत्कारप्रसंगी पारडीचे माजी सरपंच संजयभाऊ निखारे, माजी पंचायत समिती उपसभापती विलासभाऊ दशमुखे, माजी नगरसेवक चंद्रशेखरजी भडांगे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, तालुका उपाध्यक्ष दिनेश आकरे, युवा मोर्चाचे शहर महामंत्री राजूभाऊ शेरकी प्रामुख्याने उपस्थित होते.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज व्हावे याकरिता सातत्याने शासनाशी पत्रव्यवहार, बैठका, भेटी, चर्चा केल्या. मध्यंतरीच्या काळामध्ये मेडिकल कॉलेज ऐवजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न या विरोधात त्यांनी ठाम भूमिका मांडली होती. प्रथमतः जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे, त्यानंतरच सुपर स्पेशलिटीचा विचार करण्यात यावा यासाठीही त्यांनी शासनाकडे आग्रह धरून पत्रव्यवहार केला. त्यांच्या या प्रयत्नांतून अखेर मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली त्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.