पेरमिली नाल्यावरुन ट्रक वाहून गेला ; तीन मृतदेह सापडले

131

– माहिती मिळताच जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी झाले दाखल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील भामरागड मार्गावरील पेरमिलीजवळ असलेल्या नाल्यात ५ ते ६ प्रवासी असणार एक ट्रक नाल्यावरून रात्री अंदाजे ९:३० ते १०:०० च्या सुमारास वाहून गेल्याची माहिती रात्री उशिरा प्रशासनाला प्राप्त झाली होती. सकाळी अहेरीचे तहसीलदार श्री.ओंतारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी दाखल झाले. तसेच एसडीआरएफ पथक व महसूँँ कर्मचारी यांनी शोधमोहीम राबविन्यात आले असून सदर ट्रकमध्ये तीन मृृृतदेेेह मिळाले असून अहेरी तालुक्यातील कसमपली येतील सीताराम बिचू तलांडी व त्यांची पत्नी समी सीताराम तलांडी असल्याचेे समजते तर दुसरी एक महिलाचे नाव पुष्पा नामदेव गावडे असून भामरागड तालुक्यातील मोकेला गावातील असल्याचे समजले असून सदर तिन्ही मृृृतदेेेह उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले.

सदर घटनास्थळी तहसीलदार श्री.ओंतारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार, पेरमिलीचे सरपंचा सौ. किरणताई कोरेत, मेडपलीचे सरपंच श्री.निलेश वेलादी, पेरमिलीचे माजी सरपंच श्री. प्रमोद आत्राम, नगरसेवक श्री. प्रशांत गोडसेलवार व एसडीआरएफचे व महसूल कर्मचारी उपस्थित होते.