शौचालयधारकांनी आधार कार्ड व पासबुक झेरॉक्स ग्रापंला जमा करावे : विलास दशमुखे

151

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गडचिरोली तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांना शौचालय मिळाले नाही किंवा जे शौचालय बांधकामाच्या लाभापासून वंचित आहेत, अशा लाभार्थ्यांनी आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयात आधार कार्ड व पासबुकची झेरॉक्स तात्काळ नेऊन द्यावे, असे आवाहन गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास दशमुखे यांनी केले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या संदेशानुसार आणि स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट्ये दिले आहे. त्यानुसार या अगोदर अनेक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, काही लाभार्थी यातून सुटले आहेत किंवा या योजनेपासून वंचित राहिले आहेत. अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आधार कार्ड व पासबुकची झेरॉक्स नेऊन जमा करावे, असेही आवाहन माजी उपसभापती विलास दशमुखे यांनी केले.