युक्रेनवरून परतलेल्या दिव्यानी सुरेश बांबोळकर हिला भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली भेट

280

– माजी जि. प. अध्यक्ष योगिताताई भांडेकर व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक आयटीआय चौक परिसरातील रहिवासी दिव्यानी सुरेश बांबोळकर ही विद्यार्थिनी युक्रेन देशातून काल, 4 मार्च रोजी केंद्र शासनाच्या सहकार्याने गडचिरोली येथे सुखरुप पोहोचली. त्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्यांनी सदर विद्यार्थिनीच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपा महिला आघाडीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षा योगिताताई मधुकर भांडेकर व भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व तिचे सात्वंन केले. याप्रसंगी गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्षा योगिताताई प्रमोद पिपरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर आदी उपस्थित होते.
गडचिरोली येथील रहिवासी असलेली दिव्यानी बांबोळकर ही विद्यार्थिनी युक्रेन देशात एमबीबीएस तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. दरम्यान, युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने पालकवर्ग चिंतेत होते. मात्र केंद्र शासनाच्या सहकार्याने भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यात आले. त्यात गडचिरोलीकर दिव्यानी बांबोळकर ही विद्यार्थिनी सुद्धा सुखरूप घरी परतली असता भाजपा पदाधिकाऱ्यांनी तिची भेट घेऊन धीर दिला.