अनुप कोहळे आणि राधिका जुवारे यांचा नेहरू युवा केंद्र गडचिरोलीतर्फे सत्कार

228

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय भारत सरकार व नेहरू युवा केंद्रच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सव 2022 करिता गडचिरोली जिल्ह्यातून निवड झाल्याबद्दल अनुप कोहळे राजनगट्टा आणि राधिका जुवारे आमगाव (म.) यांचा नेहरू युवा केंद्र गडचिरोलीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नेहरू युवा केंद्र गडचिरोलीचे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, अध्यक्ष म्हणून हरडे महाविद्यालयाचे प्राचार्य बनपूरकर, मुख्य अतिथी म्हणून चामोर्शीच्या नगराध्यक्ष जयश्री वायलालवर, सिनेट सदस्य डॉ. संदीप लांजेवार, डॉ. विठ्ठल चौथाले, हरडे महाविद्यालय रासेयो प्रमुख डॉ. पवन नाईक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अनुप कोहळे नेहरू युवा केंद्रचा सदस्य आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा 2021 चा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त झाला असून जिल्ह्यातील युवकांचे संघटन करून त्यांना पुढे येण्याकरिता नेहमीच विविध समजपयोगी उपक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करत असतो तर राधिका जुवारे ही देवतळे महाविद्यालयात शिक्षण घेत असून रासेयोची सक्रिय विद्यार्थिनी आहे. दोघांनाही उपस्थित मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.