Home गडचिरोली रविवारला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सब ज्युनिअर ॲथलेटिक्स निवड चाचणी

रविवारला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सब ज्युनिअर ॲथलेटिक्स निवड चाचणी

80

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर (वयोगट ८, १०, १२, १४ वर्षाखालील) चॅम्पियनशिप २०२६ ही स्पर्धा ७ व ८ फेब्रुवारी रोजी एस. एम. जी. एम. कॉलेज, कोपरगाव, अहमदनगर (अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या गडचिरोली जिल्हा संघ निवडण्यासाठी गडचिरोली जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने रविवार, १८ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता जिल्हा कॉम्प्लेक्स कोटगल रोडवरील एमआयडीसी मैदानावर गडचिरोली जिल्हा सब ज्युनिअर निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेसाठी ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी स्पर्धेच्या दिवशी रविवारला सकाळी ६ वाजता प्रत्यक्ष येऊन नाव नोंदणी करावे. या स्पर्धेमधून प्रत्येक क्रीडा प्रकारातील विजयी खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्ध्येकरिता केली जाणार आहे. स्पर्धेकरिता येताना खेळाडूंनी वय पडताळणीकरिता जन्मतारखेचा दाखला सोबत आणणे आवश्यक आहे.

चाचणी स्पर्धेसाठी वयोगट
८ वर्षाखालील मुले व मुली (जन्मतारीख ९ फेब्रुवारी २०१८ते ८ फेब्रुवारी २०२० दरम्यान), १० वर्षाखालील मुले व मुली (जन्मतारीख ९ फेब्रुवारी२०१६ ते ८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान), १२ वर्षाखालील मुले व मुली (जन्मतारीख ९ फेब्रुवारी २०१४ ते ८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान), १४ वर्षाखालील मुले व मुली (जन्मतारीख ९ फेब्रुवारी २०१२ ते ८ फेब्रुवारी २०१४ दरम्यान) यांचा समावेश राहणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत सहभाग नोंदवावा व अधिक महितीसाठी ८३०८९६९५५३, ८२७५५४९५१४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव आशीष नंदनवार यांनी केलेले आहे.

error: Content is protected !!