Home गडचिरोली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाद्वारे सावेला येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाद्वारे सावेला येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

67

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाद्वारे आज, ३० डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत सावेला अंतर्गत सावेला येथे सार्वजनिक (अभ्यासिका) वाचनालयाचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले. सावेला येथे सार्वजनिक (अभ्यासिका) वाचनालय सुरू करण्यात आल्यामुळे या गावातील तरुण युवक व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता मोठी मदत होणार आहे. याशिवाय युवकांना व विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागण्यास मोलाची मदत होणार आहे.

याप्रसंगी उद्घाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोलीचे संचालक श्री. हेमंतभाऊ बोरकुटे, अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सावेलाच्या सरपंच श्रीमती सुरेखाताई बाजीराव मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून गाव पाटील श्री. लालाजी पा. मडावी, माजी सरपंच श्री. वासुदेव पा. मडावी, ग्रा. पं. सदस्य सौ. शालुबाई गेडाम, माजी ग्रा. पं. सदस्य सौ. गीताबाई मडावी, श्री. सुभाष वळधा, आशा वर्कर निलीमाताई मडावी, श्री. महादेव हिचामी, श्री. देविदास मडावी, श्री. धनराज खोब्रागडे, कृषी सहाय्यक श्री. सचिन आत्राम, ग्रा. पं. मोबिलायझर सौ. सीमा कोराम, ग्रा. पं. केंद्रचालक श्री. नयन गेडाम, सुईमारा येथील अंगणवाडी सेविका जाई गोटा, ग्रा. पं. कर्मचारी सपना अलाम, ग्रा. पं. पाणीपुरवठा कर्मचारी श्री. धनसिंग बैस, सौ. मंगला मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सावेला येथील ग्रा. पं. अधिकारी श्री. आर. डी. शिवणकर यांनी केले. या कार्यक्रमाला गावकरी मंडळी व तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!