Home गडचिरोली मच्छीगट्टा येथे व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

मच्छीगट्टा येथे व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

78
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील मच्छीगट्टा येथे राणी दुर्गावती क्रिडा मंडळ मच्छीगट्टा यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केले आहे. या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस नेते व माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अजय कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात आले. द्वितीय पारितोषिक काँग्रेस नेते हणमंतू मडावी व सामाजिक कार्यकर्ते राम वेलादी यांच्याकडून तर तृतीय पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते लिंगाजी टेकूलवार व कोठारी ग्रामपंचायतचे सदस्य कालिदास कूसनाके यांच्याकडून देण्यात आले.

कार्यक्रमाचे सह उद्घाटक म्हणून काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सोनालीताई अजय कंकडालवार उपस्थित होत्या. अध्यक्ष म्हणून काँग्रेस नेते हणमंतू मडावी, उपाध्यक्ष म्हणून लिंगाजी टेकूलवार, कालिदास कूसनाके, वेंकटेश धानोरकर होते.

यावेळी माजी जि. प. सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती मंदा मडावी, अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, राजू दुर्गे, ग्रामपंचायत सदस्य कालिदास कुसनाके, व्यंकटेश धानोरकर, चुटूगुंट्टाचे उपसरपंच सुरेश आत्राम, काशिनाथ मडावी, राम वेलादी, दिवाकर मेश्राम, ईश्वर आलाम, लिंगा टेकूलवार, साईनाथ पानेमवर, शंकर पानेमवार, संतोष हजारे, काशिनाथ मडावी, जॅकी कुसनाके, गिरमाजी सिडाम, विकास सेडमाके, संजय कोडापे, अशोक श्रीरामवार, सुरेश रामटेके, किशोर मडावी, दिनेश मडावी, हिरामण कोरेत, सचिन गेडाम, आशिष वेलादी, मनिष गौरपवार, प्रफूल मेश्राम, विशाल सिडाम, गोपी मेश्राम, पितांबर वेलादी, अनिकेत मेश्राम, भुदेव सिडाम यांच्यासह परिसरातील क्रीडा प्रेमी व स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!