Home गडचिरोली खेडी येथे ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

खेडी येथे ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

59
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदर्श क्रीडा मंडळ खेडी (रांगी), ता. धानोरा यांच्या वतीने आयोजित खेडी येथे ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी धानोरा प्रशांत कोराम, रोहिदासजी राऊत, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, महिला तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी धानोरा शेवंताबाई हलामी, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली रुपेश टिकले तसेच गावातील मान्यवर, क्रीडाप्रेमी तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले असून ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!