Home गडचिरोली अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी

39
Oplus_16908288

– मानवाधिकार संघटनेचे डॉ. प्रणय खुणे यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यामध्ये नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीतील उभे पिक मोठ्या प्रमाणात खाली आडवे पडले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी यांच्या हलके धान पिके अवकाळी पावसाच्या पाण्यात सापडून भिजल्याने त्या शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केली आहे.

या अवकाळी पावसामुळे सर्व शेतकऱ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काही शेतकऱ्यांची धान कापणी झालेली आहे. अवकाळी पावसात धान भिजून खूप मोठा नुकसान झालेला आहे. तरी राज्य शासनाने जिल्ह्यातील समस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे व झालेल्या नुकसानाची भरपाई राज्य शासनाने करावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केली आहे.

Oplus_16908288

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या समस्त शेतकरी बांधवांचे शेतीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावे. हातातोंडाशी आलेले धानपिक डोळ्यादेखत वाया गेले. बंगालच्या उपसागरातील वादळामुळे गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. धानपिक कापणीला आले. वर्षभर पोटाची भूक भागविणाऱ्या पिकाची अशी नासाडी झाली. त्यामुळे शेतकऱ्यावर अश्रू ढाळण्याची, दुर्दैवी वेळ आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या धानपिकाचे हे दृश्य मन हेलावून टाकणारे आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केली आहे.

error: Content is protected !!