विदर्भ क्रांती न्यूज
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या सामाजिक क्रांतीचा साक्षीदार असलेल्या नागपूर शहरात “सकल ओबीसी महामोर्चाचे” आयोजन 10 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. या मोर्चाच्या माध्यमातून महायुती सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी आरक्षणासंदर्भात काढलेल्या काळ्या जीआरचा निषेध करण्यात आला.

शासनाचा हा जीआर म्हणजे ओबीसी समाजाच्या मुलभूत हक्कांवर आणि आरक्षणाच्या अधिकारावर झालेला जाणीवपूर्वक आघात आहे. राज्य सरकारने हा काळा जीआर रद्द करून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना तातडीने करावी व त्यावर आधारित आरक्षण देण्यात यावे, अशी ठाम भूमिका या मोर्चातून घेण्यात आली. २ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द होईपर्यंत आमचा लढा अखंड सुरू राहणार, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.







