Home गडचिरोली ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी नागपुरात काढला सकल ओबीसी महामोर्चा

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी नागपुरात काढला सकल ओबीसी महामोर्चा

52
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेला सकल ओबीसी महामोर्चा नागपूरात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. हा मोर्चा १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियम येथून निघून संविधान चौक येथे संपन्न झाला.

या महामोर्चातून मराठ्यांचे ओबीसीकरण करणारा काळा जीआर रद्द करावा, खोटे कुणबी दाखले देणे थांबवावे, जातीनिहाय जनगणना व्हावी तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण निधी मिळावा अशा ठाम मागण्या मांडण्यात आल्या.

या मोर्चात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आमदार रामदास मसराम यांनी ओबीसी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाम भूमिका घेत समाजबांधवांना एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले.

error: Content is protected !!