Home गडचिरोली समाजाच्या हितासाठी एकटवला जैन कलार समाज

समाजाच्या हितासाठी एकटवला जैन कलार समाज

140

– कोजागिरी व स्नेहमिलन ; गुणवंतांच्या सत्कारासह प्रगतीसाठी विचारमंथन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा जैन कलार समाज न्यास व जैन कलार समाज गडचिरोली शहराच्या वतीने शहरातील जैन कलार समाजाचा स्नेहमिलन सोहळा व कोजागिरीचा कार्यक्रम बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी चामोर्शी मार्गावरील कमल-केशव कात्रटवार सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समाजाची प्रगती व हितासाठी विचारमंथन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा जैन कलार समाज न्यासचे अध्यक्ष रतन शेंडे होते. उद्घाटन जैन कलार सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष बंडू शनिवारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून न्यासचे सचिव पांडुरंग पेशने, जैन कलार समाज बचत गटाचे अध्यक्ष प्रदीप रणदिवे, सचिव मनोज कवठे, हिना बांगळकर, महेश मुरकुटे, राजू घुगरे, वर्षा शनिवारे, सुरेखा रणदिवे, वैशाली लाड, अर्चना खानोरकर, ज्योती मानापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम गजेंद्र भिवापुरे, प्रमोद घोसेकर, लक्ष्मीबाई मानापुरे, पुष्पा तिडके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नवागत समाज बांधवांचा परिचय करून घेण्यात आला. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक दिलीप समर्थ, गुलाबराव मानापुरे, नलिनी मानापुरे आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी अशोक मानापुरे, मुरली खानोरकर यांचा सपत्नीक तसेच ललिता मुरकुटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीचे गुणवंत विद्यार्थी आंजनय डांगे, आरोही तिडके, सिद्धी हरडे यांचा सन्मानचिन्ह व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांनी नृत्य व मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. मनमोकळी, उत्साहवर्धक व स्नेहपूर्ण वातावरणात उपस्थित समाजबांधवांनी स्नेहभोजन व रात्री कोजागिरीचा आनंद घेतला. एकमेकांसोबत संवाद साधून नियोजनात्मक चर्चा केली.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना रतन शेंडे म्हणाले, कलार समाजामध्ये गुणवंतांची कमी नाही. पालकांनी आपल्या पाल्याला घडविण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. समाज भवनासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकसंघ राहण्याची गरज आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उमेश समर्थ तर संचालन पराग दडवे यांनी केले. आभार प्रदर्शन गुरुदेव किरणापुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप आष्टेकर, नितीन डांगे, निलेश डांगे, प्रकाश डांगे, भोजराज दडवे, अनिल तिडके, विजय तिडके, रमेश गोटेफोडे, अरविंद गुरुकार, डॉ. पियुषा समर्थ, जयश्री आष्टेकर, रिना दडवे, रोशनी डांगे, नमिता डांगे, तेजस्विनी किरणापुरे, ज्योती फरांडे, नंदा डांगे, दीदिपाली दडवे, सपना तिडके, रेखा गुरुकार, मंगला गोटेफोडे, कल्पना तिडके यांनी पुढाकार घेतला.

कार्यक्रमास प्रदीप लाड, सुधीर शेंडे, ॲड. अरुण रणदिवे, राजेंद्र लांजेकर, विजय मुरकुटे, किशोर भांडारकर, कविश्वर बनपूरकर, सुरेश वैरागडे, अरूण हरडे, सुनील हजारे, स्वाती कवठे, भाग्यश्री शेंडे, अरुणा लांजेकर, स्नेहा शेंडे, सरिता पेशने, अर्चना भांडारकर, कल्पना लाड, लता मुरकुटे, रेखा समर्थ, गुरु हरडे, राजेंद्र खानोरकर, रवी समर्थ आदींसह जैन कलार समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!