Home गडचिरोली कारवाफा बीटस्तरीय क्रीडा संमेलनाचे थाटात उद्घाटन

कारवाफा बीटस्तरीय क्रीडा संमेलनाचे थाटात उद्घाटन

223

– आठ आश्रमशाळांचा सहभाग ; क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी उतरले ५३२ खेळाडू मैदानात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा बीटस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचे बुधवार, २४ सप्टेंबर रोजी कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या मैदानावर थाटात उद्घाटन झाले. यात कारवाफा बिटातील आठ आश्रमशाळेतील ५३२ आदिवासी खेळाडू क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. सदर क्रीडा संमेलनाचे आयोजन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा संमेलनाचे उद्घाटन सरपंच महानंदा आतला व सहउद्घाटक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल सिडाम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विभा बागडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जांभळीचे उपसरपंच पुरुषोत्तम बावणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा रंधये, केंद्रप्रमुख संध्या मोंढे, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, मुख्याध्यापक विष्णू चव्हाण, अनिल सोमनकर, मंगेश ब्राह्मणकर, सुनील नन्नेवार, प्रकाश नरोटे, विजय बागडे, धनिराम कुमरे, रामजी पुडो,चंदू नरोटे, संदीप आतला, देवराव नैताम, प्रमिला दहागावकर, कुसुम नरोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान कारवाफा आश्रमशाळेतील मुलींनी आदिवासी नृत्य सादर केले. उद्घाटनीय कबड्डीचा १९ वर्षे वयोगटातील मुलांचा सामना गट्टा व पेंढरी संघादरम्यान झाला. यात गट्टा संघ विजयी ठरला. कारवाफा बीट स्पर्धेत कारवाफा, गडचिरोली, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही या शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित अशा आठ आश्रमशाळांचा समावेश आहे. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो- खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक खेळासह लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे या वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे यांनी केले. खेळाडूंना प्राजक्ता सिडाम या विद्यार्थीनीने शपथ दिली. पंचांना शपथ व पथसंंचालन बीट निरीक्षक रविकांत पिपरे यांनी केले. संचालन कविता बारसागडे तर आभार प्रदर्शन व्ही. एस. देसू यांनी केले.

उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीट निरीक्षक आशिष नंदनवार, संदिप हिचामी, शैलेश भैसारे, पद्मावती महेशगौरी, एम. ई. ठाकूर, टी. ए. आस्कर, सी. डी. नळे, चंदा वानखेडे, वर्षा मस्के, चंदा कोरचा, संजय धंदर, अधीक्षक भारत कोरडे, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, शिवानी शेट्टीवार, स्वप्निल राठोड, करिष्मा गोवर्धन, अभय कांबळे, हितेश गावळकर, योगेश उसेंडी, सुनिता देवावार, संगीता करंगामी, सुधीर झंजाळ, नितेश नेवारे, निलेश कळंब, कारवाफा बिटातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!