Home गडचिरोली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या गडचिरोली दौऱ्यावर

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या गडचिरोली दौऱ्यावर

55

– महसूल, मुद्रांक शुल्क, नोंदणी, भूमिअभिलेखच्या कामकाजाचा घेणार आढावा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 19 सप्टेंबर 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, मुद्रांक शुल्क, नोंदणी तसेच भूमिअभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार असून नागरिकांची निवेदनेही स्विकारणार आहेत.

19 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 12 ते दुपारी 1 जिल्हाधिकारी कार्यालयात नागरीकांची निवेदने स्विकारतील. दुपारी 1 ते 2.30 जिल्हाधिकारी यांच्याकडील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला जाईल. दुपारी 2.30 ते 3.30 मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचा आढावा, दुपारी 3.30 ते 4.30 भूमिअभिलेख विभागाचा आढावा घेण्यात येईल. सायं. 5 वाजता पत्रकारांशी चर्चा. सायंकाळी 5.30 ते 7 महाराजा लॉन्स, धानोरा रोड गडचिरोली येथे राखीव राहील.

error: Content is protected !!