Home गडचिरोली चामोर्शी – गडचिरोली मार्गावर पोहर नदीवरील पुलावर खराब रस्त्यामुळे ट्रॅफिक जॅम

चामोर्शी – गडचिरोली मार्गावर पोहर नदीवरील पुलावर खराब रस्त्यामुळे ट्रॅफिक जॅम

49

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी – गडचिरोली मार्गावर पोहर नदीवरील पुलावर खराब रस्त्यामुळे जवळपास 5 किलोमीटर अंतरावर ट्रॅफिक जॅम झाला होता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तसेच अधिकारी व मुजोर ठेकेदाराच्या नालायकपणामुळे सर्वसामान्य जनतेला, शालेय विद्यार्थ्यांना व अनेक रूग्णांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत अशाप्रकारे प्रशासनाच्या व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे जर सर्वसामान्य जनतेला त्रास झाल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर दंडणीय कारवाईसह फौजदारी कार्यवाही करण्याचे ठरले असताना कोणाच्या मेहरबानीमुळे अशाप्रकारची परस्थिती निर्माण होत आहे व वारंवार तक्रारी व आंदोलने करून सुद्धा यांची का दखल घेण्यात येत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रकारामुळे जनतेत प्रचंड आक्रोश आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक आशिष पिपरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

error: Content is protected !!