Home गडचिरोली राज्य सरकारने घोट भागातील प्रलंबित समस्या सोडवाव्या

राज्य सरकारने घोट भागातील प्रलंबित समस्या सोडवाव्या

58
Oplus_16908288

– घोट – नवेगाव येथे आयोजित जनाआक्रोश आंदोलनात आंदोलनकर्त्यांची एकमुखी मागणी

– राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोशी तालुक्यातील घोटजवळील नवेगाव येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो) दिल्ली जिल्हा गडचिरोली तालुका शाखा घोटच्या वतीने
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व रस्ते नवीनीकरण करावे, घोट भागातील सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने लक्ष द्यावे, गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नाकडे राज्य शासनाने लक्ष वेधावे, यासाठी विराट जनआक्रोश आंदोलन आज, 10 सप्टेंबर रोजी चामोर्शी तालुक्यातील घोट – नवेगाव मार्गावर करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विस्वास, प्रमुख वक्ते प्रकाश गेडाम, रेखाताई डोळस यांनी केले. यावेळी अशोक पोरेड्डीवार, नामदेव सोनटक्के, अनिता रॉय, जाहेदा शेख, अनिता मडावी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रणय खुणे, प्रकाश गेडाम, रेखाताई डोळस, अशोक पोरेड्डीवार, नामदेव सोनटक्के, जाहेदा शेख, स्नेहा मेश्राम यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित केले.

आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केले तर आभार जिल्हा उपाध्यक्ष अनुभव उपाध्ये यांनी मानले.

या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये घोट – रेगडी भागातील 14 गावातील नागरिकांना सिंचनाकरिता पाण्याची सोय झाली पाहिजे, अतिक्रमण जमिनीचे पट्टे तत्काळ मिळाले पाहिजे, घोट तालुक्याची निर्मिती झाली पाहिजे, साखरदेव देवस्थान पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणे, मुतनूर व कोठरी पर्यटन स्थळाचा विकास करणे, घोट भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे याकरिता शासनाने घोट भागात उद्योग उभारावे, चामोर्शी – मूल मार्गाची तत्काळ दुरुस्ती करणे, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील विविध रस्ते तत्काळ दुरुस्ती करण्यात यावे, पोहर नदीवरील पुलिया जवळ रस्ता दुरुस्ती करणे, सुरजागड व कोणसरी येथील लॉयड मेटल कंपनीत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे, दिना धरणाची उंची वाढवणे व पाण्याची पातळी वाढवण्यासाठी धरणाची खोलीकरण करणे, चामोर्शी तालुक्यात दारूबंदी हा विषय कडक करणे, मछली चापलवाडा बस सुरू करणे, घोट नवेगाव मार्गाची तत्काळ दुरुस्ती करणे, दिना धरण परिसर सौंदर्यीकरण करणे, घोट नवेगाव मार्गाची तत्काळ दुरुस्ती करणे, चामोर्शी येथे एमआयडीसी निर्माण करणे, घोट मार्ग ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत रस्ता तत्काळ दुरुस्त करणे व जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध समस्यांचे तत्काळ निराकरण करणे, राज्य शासनाने घोट क्षेत्रातील विविध समस्याकडे लक्ष द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केले तर आभार जिल्हा उपाध्यक्ष अनुभव उपाध्ये यांनी मानले. घोट परिसरातील नागरिकांनी या जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, आसिफ सैय्यद, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत शहा, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू, गडचिरोली तालुकाध्यक्ष मोरेश्वर भांडेकर, गडचिरोली तालुका सचिव दीपक सातपुते, चामोर्शी तालुका सचिव संतोष बुरांडे, महिला आघाडी अध्यक्ष विशाखा सिंह, महेंद्र मडावी, दिनेश मुजुमदार, किशोर देवतळे, शरीफ शेख, लीना विस्वास, मेघा कुमरे, जितेन शहा, राकेश शेमले, सचिन साखरकर, प्रियंका शेमले, सुमन नेवारे, भोलू पठाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!