– आंदोलनात सहभागी होण्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र सरकारने पारित केलेला जन सुरक्षा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व विरोधी पक्ष व सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लोकशाही व संविधानविरोधी जन सुरक्षा कायद्याचा विरोध करावा, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.







