Home गडचिरोली राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने उद्या नवेगाव – घोट रोडवर जनआक्रोश आंदोलन

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने उद्या नवेगाव – घोट रोडवर जनआक्रोश आंदोलन

83

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व रस्ते नवीनीकरण करावे, घोट भागातील सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने लक्ष द्यावे, गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नाकडे राज्य शासनाने लक्ष द्यावे, यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील नवेगाव – घोट रोडवर विराट जनआक्रोश आंदोलन उद्या, 10 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, राष्ट्रीय सल्लागार प्रकाश गेडाम हे करणार आहेत.

या आंदोलनातील प्रमुख मागण्या : घोट – रेगडी भागातील 14 गावातील नागरिकांना सिंचनाकरिता पाण्याची सोय झाली पाहिजे, अतिक्रमण जमिनीचे पट्टे तात्काळ मिळाले पाहिजे, घोट तालुक्याची निर्मिती झाली पाहिजे, साखरदेव देवस्थान पर्यटनस्थळ म्हणून घोषित करणे, मुतनूर व कोठरी पर्यटनस्थळाचा विकास करणे, घोट भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, या करिता शासनाने घोट भागात उद्योग उभरावे, चामोर्शी मूल मार्गाची तात्काळ दुरुस्ती करणे, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील विविध रस्ते तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे, पोहर नदी वरील पुलिया जवळ रस्ता दुरुस्ती करणे, सुरजागड व कोणसरी येथील लॉयड मेटल कंपनीत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे, दिना धरणाची उंची वाढवणे व पाण्याची पातळी वाढवण्यासाठी धरणाची खोलीकरण करणे, चामोर्शी तालुक्यात दारूबंदी हा विषय कडक करणे, मछली चापलवाडा बस सुरू करणे, घोट नवेगाव मार्गाची तात्काळ दुरुस्ती करणे, दिना धरण परिसर सौंदर्यीकरण करणे, घोट नवेगाव मार्गाची तात्काळ दुरुस्ती करणे, चामोर्शी येथे एमआयडीसी निर्माण करणे, घोट मार्ग ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत रस्ता तत्काळ दुरुस्त करणे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध समस्यांचे तत्काळ निराकरण करणे व राज्य शासनाने घोट क्षेत्रातील विविध समस्या कडे लक्ष द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

सदर प्रमुख मागण्यांच्या निराकरणासाठी विराट जनआंदोलन बुधवार,10 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आले आहे. घोट परिसरातील नागरिकांनी या जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली, तालुका शाखा चामोर्शी, शाखा घोटच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!