– माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : सन 1982 रोजी गडचिरोली जिल्हा निर्माण झाल्याने गडचिरोली शहर व इतर तालुकास्थानी शहराच्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या महसूल, झुडपीजंगल व सींचाई विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून नागरीक अस्थाई वास्तव्य करीत आहेत. सध्या केन्द्र व राज्य सरकारने अशा लोकांना घरकुल मंजुर केलेले आहे. परंतू मागील 40 ते 45 वर्षापासून वास्तव्य करीत असलेल्या झोपडपट्टीधारकांना स्थायी पट्टा देण्यात आलेला नाही. त्यामुळे गोरगरिबांना नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात घरकूल बांधकाम करता येत नाही.
हा विषय घेउन माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी माजी आमदार यांनी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस व महसुलमंत्री चन्द्रषेखरजी बावनकुळे यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यानुसार मुख्यमंत्री तथा महसुलमंत्री यांनी तत्काळ बैठक बोलविण्याचे निर्देष जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पत्राद्वारे सुचित केले. या पत्राची प्रत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना देण्यात आली.
त्यावेळी भाजपा शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अनिलजी कूनघाडकर, किसान सेलचे प्रदेश सचिव रमेशजी भूरसे, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आरोग्य सभापती चंद्रशेखर भडांगे, भाजपा कार्यकर्ता अविनाश विश्रोजवार, सेवानिवृत्त तहसीलदार पुष्पाताई कुमरे, भाजप शहर महामंत्री हर्षल हर्शल गेडाम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.







