Home गडचिरोली शालेय बेसबॉल, बॉल बॅडमिंटन व टेनीकाईट स्पर्धा उत्साहात संपन्न

शालेय बेसबॉल, बॉल बॅडमिंटन व टेनीकाईट स्पर्धा उत्साहात संपन्न

67

– विजयी संघ विभाग स्तरावर करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : क्रीडा व योग सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्यातर्फे गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर 14, 17 व 19 या वयोगटातील शालेय खेळाडूंची बेसबॉल, बॉल बॅडमिंटन व टेनीक्वाईट स्पर्धा 9 व 10 सप्टेंबर 2025 रोजी पार पडली. या स्पर्धेला जिल्ह्यातील जवळपास 450 खेळाडूंनी भाग घेतला होता.

या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, अध्यक्ष म्हणून गोंडवाना सैनिक विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, विशेष अतिथी म्हणून नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक आंबीलकर, वानखेडे, क्रीडा शिक्षक भूपेश चौधरी, प्रा. रूपाली पापडकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक नाजूक उईके, संघटना सचिव प्रा. ऋषिकांत पापळकर, आशिष निजाम, सॉफ्टबॉल एनआयएस कोच प्रसाद ताजणे, पंच शेषराज खेडेकर, वैभव नागपुरे, सुमित आलम, विनय कोवे, सौरभ रामटेके आदी उपस्थित होते.

Oplus_16908288

या स्पर्धेदरम्यान समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी स्पर्धेला विशेष भेट दिली. यात बेसबॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात मुलांमध्ये नवबौद्ध मुलांची निवासी शाळा नवेगाव तर मुलींमध्ये नवबौद्ध मुलींची निवासी शाळा सिरोंचा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 17 वर्षे वयोगटात मुलांमध्ये गोंडवाना सैनिक विद्यालय गडचिरोली मुलींमध्ये शिवाजी हायस्कूल चामोर्शी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 19 वर्षे वयोगटात मुलांमध्ये जेएसपीएम धानोरा तर मुलींमध्ये स्वामीव विवेकानंद ज्युनिअर कॉलेज गडचिरोली यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

बॉल बॅडमिंटन स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात मुलांमध्ये भगवंतराव विद्यालय ठाकरे तर मुलींमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल गडचिरोली यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. सतरा वर्ष वयोगटात मुलांमध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली तर मुलींमध्ये शिवाजी हायस्कूल गडचिरोली यांनी प्रथम क्रमांक पटकीला. 19 वर्षे वयोगटात मुलांमध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली तर मुलींमध्ये स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज गडचिरोली यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

टेनिकाईट स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये प्रज्ञासंस्कार हायस्कूल गडचिरोली तर मुलींमध्ये प्रज्ञा संस्कार हायस्कूल गडचिरोली यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 17 वर्षे वयोगटात मुलांमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल गडचिरोली तर मुलींमध्ये शिवाजी हायस्कूल गडचिरोली तर 19 वर्षे वयोगटात मुलांमध्ये गोंडवाना सैनिकी स्कूल गडचिरोली तर मुलींमध्ये स्वामी विवेकानंद हायस्कूल गडचिरोली यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. हे सगळे विजयी संघ विभाग स्तरावर आपापल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेसबॉल, बॉल बॅडमिंटन व टेनीक्वाईट पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!