– चामोर्शी येथे संत निरंकारी मिशनचे रक्तदान शिबिर
– ८० रक्तदात्यांनी केले रक्तदान
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानासाठी रक्तदात्यांनी स्वतःहून पुढे यावे. रक्तदानाचे कार्य हे मानवतेचे कार्य आहे, असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळ वडसा आणि नागपूरचे झोनल इन्चार्ज किशन नागदेवे यांनी केले.
संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन नवी दिल्ली शाखा चामोर्शीच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन चामोर्शी येथे रविवार, ७ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जीवनकला बोरकुटे, खुशाल झोडगे, आयोजक अशोक बोरकुटे, सुरेश शहा, साईनाथ बुरांडे, जयराम चलाख, प्रा. डॉ. राजेंद्र झाडे, डॉ. किशोर आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
सद्गुरू बाबा हरदेव सिंह महाराज यांच्या वचनानुसार रक्तदान करून रक्त हे मानवाच्या नाडीमध्ये वाहिले पाहिजे या उदात्त हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्या जाते. संत निरंकारी मंडळ चामोर्शीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे संचालन वैशाली लंजे तर आभार प्रदर्शन विद्या बोरकुटे यांनी केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक भोजराम लंजे, फुलचंद गेडाम, प्रफुल गवारे, निरंजना रामटेके, वंदना ढोडरे, देवनाथ ढोडरे, नाजूक येलमुले, रवींद्र बुरांडे, निकेश खोब्रागडे, गिरिधर कन्नाके, घनश्याम बोधलकर, सुभाष मिडपलीवार, वसंत वासेकर, सुरेश बावणे, चिनाजी करेवार, कोमरू मिटपलीवार, प्रशांत बुध्दे, रूपचंद पिपरे, तेजराम लंजे, पंढरीनाथ पाल, प्रमोद देवगिरकर, दिलीप भोयर, छगनलाल पर्वते, आशुतोष कोठारे, रामदास पुंघाटी, संतोष कसंगोतीवार, सुभाष धाली, निरांतर लोणारे, संतोष वडेगवार, अवतार तंतकवार आदींनी सहकार्य केले.







