विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ मिलिंद नरोटे यांच्या चामोर्शी मार्गावरील कर्तव्य कक्ष क्रमांक एक येथे दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाने गडचिरोलीकरांना भक्तिभाव, आनंद आणि सामाजिक उपक्रमांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
या काळात कर्तव्य कक्षातील सर्व कर्मचारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते गणपती बाप्पाच्या आरत्या, भजन, कीर्तन व विविध उपक्रमांत रममाण झाले होते.
या भक्तिरसात न्हालेल्या प्रवासाचा समारोप शनिवार, 6 सप्भाटेंबर रोजी भावनिक वातावरणात करण्यात आला. विधीवत पूजा करून, भजन-कीर्तनाच्या गजरात, गणपती बाप्पाचे विसर्जन नगर परिषदेने उभारलेल्या कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आले.
संपूर्ण परिसर “गणपती बाप्पा मोरया – पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषांनी दुमदुमून गेला. हा सोहळा केवळ धार्मिक नव्हे तर पर्यावरण संवर्धनाचा आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श ठरला.







