Home गडचिरोली बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी उद्योजक बनावे : योगिता पिपरे

बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी उद्योजक बनावे : योगिता पिपरे

66

– महिला आर्थिक विकास महामंडळ व सखी लोक संचालित साधन केंद्र गडचिरोली यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा गोंडवाना कला दालन पोटेगाव रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये महिला उद्यमिता आणि आर्थिक सशक्तिकरणाच्या दृष्टीने विशेष विचारमंथन करण्यात आले. महिलांसाठी नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या संधी, वित्तीय सहाय्य आणि त्यांच्याकडून केलेले विविध उपक्रम यावर चर्चा झाली.

महिला आर्थिक विकास महामंडळाने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वार्षिक आमसभा पार पडली. यावेळी मार्गदर्शनात यशस्वी महिलांच्या कुटुंबीयांपर्यंत अनेक सरकारी योजनांची माहिती पोहोचवली गेली आहे.

कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणाचा भाग म्हणजे महिलांना त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे. यामध्ये महिलांसाठी खासतर वित्तीय आणि डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जात आहे. महिला आयोगाने महिलांच्या व्यवसायांच्या सवर्धनासाठी तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील मागणीनुसार सहाय्य पुरवले जात आहे. गडचिरोलीतील महिलांना या कार्यक्रमांतून रोजगार आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी तांत्रिक माहिती आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गडचिरोली येथील अतिदुर्गम, मागासवर्गीय, आदिवासी महिलांसाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ज्यामुळे त्या आपल्या स्वावलंबी, सशक्त आणि आत्मनिर्भर भवितव्याचा मार्ग तयार करू शकतात. या कार्यशाळेने त्यांना नवीन दृष्टिकोन दिला आहे. ज्यामुळे त्या समाजात आपली ठोस ओळख बनवून बचतगटाच्या माध्यमातून महिला व युवती उधोजक बनू शकतील, असे प्रतिपादन योगिताताई पिपरे यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश ए. पी. खानोरकर, झाडे (माविम), सोरते (बँक), वैशाली विधाते, प्रतिभाताई चौधरी, वर्षाताई शेडमाके, अर्चनाताई चन्नावार, गीताताई गुड्डी आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!