Home गडचिरोली आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तनुश्रीताई...

आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तनुश्रीताई आत्राम यांची भेट

79
Oplus_16908288

– बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असतानाही कर्मचारी यांनी माणुसकीचे दर्शन घडवित केली रुग्णसेवा

– आंदोलनस्थळी तनुश्रीताई आत्राम यांनी भेट देऊन NHM कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांविषयी केली चर्चा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी (एनएचएम) यांना नियमित सेवेत समावेशन करण्यासाठी 14/03/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे. सव्वा वर्षे कालावधी होवूनही अंमलबजावणी होत नसल्याने, मानधनवाढ, Loyalty Bonus, EPF, Insurance, बदली धोरण मान्य होत नसल्याने तसेच मा. आरोग्य मंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी दि. 08 व 10 जुलै 2025 रोजी संघटना शिष्टमंडळास समायोजन प्रक्रिया व विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न झाल्याने दि. 19/08/2025 पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेले आहे. दरम्यान, माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांनी एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.

सदर कर्मचारी हे भर पावसात जिल्हा रुग्णालय परिसरात आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करीत होते. अशातच २ मूत्रपिंडाने आजारी आकस्मिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता आले असल्याची बाब आंदोलनकर्त्या कर्मचारी यांना माहिती होताच तत्काळ आंदोलनातील तंत्रज्ञ यांना पाठवून संबंधित रुग्णांना सेवा देण्यात आली. आंदोलनकर्त्या कर्मचारी यांनी माणुसकीचे दर्शन घडवित केलेल्या रुग्ण सेवेबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.

यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी
एकत्रीकरण समिती जिल्हा शाखा गडचिरोली जिल्हा समन्वयक जितेंद्र कोटगले, राजकुमार देवके, निलेश सुभेदार, वैशाली बोबाटे, मनोज गेडाम, राहुल कंकनालवार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!