Home गडचिरोली महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेच्या संचालक मंडळाची  बैठक संपन्न

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेच्या संचालक मंडळाची  बैठक संपन्न

76

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे येथील  अध्यक्ष, उपाध्यस, मानद सचिव यांच्या निवड प्रक्रियेसाठी संचालक मंडळाची पहिली बैठक पिठासीन अधिकारी जिल्हा उपनिबंधक (डी. डी. आर.) जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यात विधानपरिषद महाराष्ट्र राज्य गटनेते आमदार प्रवीणजी दरेकर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे या शिखर संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मानद सचिव म्हणून तत्कालीन अध्यक्ष रामदास मोरे यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून अर्जुनराव बुरुडे यांची एक मतानी निवड झाली. यावेळी सहकार पॅनलचे सहकारी व महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघ मर्यादित पुणेचे संजयजी कुसाळकर, शिवाजीराव नलावडे मुंबई प्रामुख्याने उपस्थित होते.

निवड प्रकिया पूर्ण झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना नागपूर विभागातून निवडून आलेले नवनियुक्त संचालक प्रमोदजी पिपरे म्हणाले, मी सहकार पॅनलमध्ये अधिकृत सामील झालो असून महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेचे अध्यक्ष आमदार प्रवीणजी दरेकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रवाढीला पुन्हा मदत होणार आहे. जिल्हा संघाचा सुद्धा विकास करण्यात यावा, असे आपल्या मनोगतात पिपरे यांनी सांगितले.

सर्व नवीन पदाधिकारी व संचालक मंडळाचे स्वागत करूनbपुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या बैठकीमध्ये सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रावळ, मुख्य अधिकारी बोडके, मुळक व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!