विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव तथा राज्य परिषद सदस्य गोवर्धनजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज, 18 ऑगस्ट रोजी जिल्हा महिला रुग्णालय गडचिरोली येथे ‘माणुसकीचा घास’ या उपक्रमाअंतर्गत अन्न वितरित करण्यात आले.
येथील जिल्हा महिला रुग्णालयात ‘माणुसकीचा घास’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत आज 948 व्या दिवशी गोवर्धन चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णांना अन्न वितरित केले.
याप्रसंगी भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव तथा राज्य परिषद सदस्य गोवर्धनजी चव्हाण, दिवाकर नक्षिणे, सुधाकर पेटकर, संजय बारापात्रे, प्रशांत अलमपटलावार, संजय मेश्राम, दशरथ सोनटक्के, दयाराम खोबरे, अनिल देवोजवार, प्रकाश मारबते, रमेश मुरमुरवार आदींची उपस्थिती होती.







