Home गडचिरोली पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीचे एकनिष्ठतेने पालन करा : माजी आमदार डॉ. देवरावजी...

पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीचे एकनिष्ठतेने पालन करा : माजी आमदार डॉ. देवरावजी होळी

110
Oplus_16908288

– भाजपा एटापल्ली तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी एटापल्ली तालुका कार्यकारिणीची विस्तारित बैठक बाबुरावजी गंपावार यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत नुकतीच जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यां नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. देवराव होळी यांनी आपल्यावर पक्षाने जी जबाबदारी सोपविली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडावी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनेला विश्वासात घेवुन कार्य करावे, असे आवाहन केले. माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते नियुक्ती घोषित करण्यात आली. यावेळी उपस्थित नवनियुक्त कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी आदिवासी आघाडी जिल्हा महामंत्री प्रशांत आत्राम, व्येकटेश मडावी, जिल्हा सचिव मोहन नामेवार, तालुका अध्यक्ष प्रसाद पुलरवार, भाजपा जेष्ठ नेते बाबुरावजी गंपावार, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकमपल्लीवर, शहराध्यक्ष अशोक पुलरवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राकेश तेलकुंटावार, तालुका महामंत्री राकेश हिरा, तालुका महामंत्री बाबला मुजुमदार, अशोक चकिनारपवार, बालाजी मोहुर्ले, प्रशांत मंडल, वनिता कोरामी, विजयालक्ष्मी जंबोजवार, जया पुडो, भाग्यश्री खोब्रागडे, रीना बेपारी, सुरेखा अडगोपुलवार, नितीन तोडेवार, राकेश विरमलवार, संजय तिम्मा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!