– शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, जन सुरक्षा विधेयक रद्द करा अशा मागण्यांची केली नारेबाजी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शेतकरी कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांचे इतर मागण्यांसाठी 24 जुलै रोजी महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते. त्या चक्काजाम आंदोलनाचा एक भाग म्हणून आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव- ठाणेगाव येथील बस स्टॅन्डवर गुरुवार, 24 जुलै 2025 रोज सकाळी दहा वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बाजूने प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू व अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा सुरू आहे.सर्व शेतकऱ्यांनी जात, पात, धर्म, राजकीय विचार बाजूला ठेवून एकत्र आले आहेत. त्यांच्या हितासाठी बच्चू कडू हे अहोरात्र झटत असून शेतकरी आत्महत्येच्या गावातून सातबारा कोरा कोरा या शीर्षकाखाली पदयात्रा जवळपास 140 किलोमीटर काढण्यात आली तरी पण अजूनपर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांचा पूर्णपणे कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही. उलट लोकशाही मार्गाने आंदोलन दडपण्याचा उद्देशाने जन सुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर करून घेतला आहे .या विरोधात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यामध्ये डोंगरगाव, भुसारी, ठाणेगाव बस स्टॅन्ड या ठिकाणी 24 जुलै 2025 रोज सकाळी दहा वाजेपर्यंत भरपावसात चक्काजाम आंदोलन करण्यात आला.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा – कोरा करा, जन सुरक्षा विधेयक रद्द करा, 58 वर्षा वरील सर्व शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना मासिक पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, शेतकऱ्यांना चोविस तास व मोफत विद्युत पुरवठा करा इत्यादी नारे देण्यात आले. नारेबाजी व चक्काजाममुळे काही वेळ तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आपल्या आंदोलनावर ठाम असलेल्या आंदोलनकर्त्यांना शेवटी पोलीसाना जबरदस्तीने उचलून गाडीने पोलिस स्टेशना आणावे लागते. पोलीस स्टेशनला नायब तहसीलदार दोनाडकर यांना निवेदन देण्यात आले.
या चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व गडचिरोली जिल्ह्याचे प्रहार चे जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड, लक्की पाटील, उबाठा सेनेचे सागर मने, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत बनकर, उबाठाचे तालुका अध्यक्ष भूषण सातव, मनसेचे तालुकाध्यक्ष भारत कुमरे, प्रहारचे जिल्हा सचिव अपंग आघाडीचे अनंत भोयर, विवेक ठाकरे, प्रहारचे तालुकाप्रमुख, विकी उंदीरवाडे, होमराज माकडे यांनी केले. या आंदोलनात देऊळगावचे माजी उपसरपंच कवडु सहारे, राजू सामृतवार, सुधीर ठाकरे, संतोष सेलोटे, सिंकदर नंदरधने, अमर उपरीकर, आकाश लोथे, अजय नारनवरे, आकाश खोब्रागडे, कवळु कत्रे, दिलीप मेश्राम हे सुद्धा सदर आंदोलनामध्ये प्रामुख्याने सहभागी होते. शेकडो शेतकरी चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.







