– वाढदिवसानिमित्त अरविंदभाऊ कात्रटवार यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
– शेकडो नागरिकांना वस्त्रभेट, कातखेडा येथे ग्रामवासीयांना सार्वजनिक कामासाठी भांडी वाटप आणि वृक्षलागवडीचा उपक्रम
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे येथील लढव्ये नेते तथा जनसेवा हाच मानवधर्म मानून गोरगरीबांच्या मदतीसाठी सदैव धावून जाणारे व्यक्तीमत्व अरविंदभाऊ कात्रटवार यांचा वाढदिवस काल, 23 जुलै रोजी सेवाभाव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो शिवसैनिक, विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शेकडो नागरिकांना ‘वस्त्रभेट’ तसेच कातखेडा येथील ग्रामवासीयांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी स्वयंपाक भांडी भेट दिली. तसेच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरचे वनचरे’ या संकल्पनेतून वृक्षलागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
शिवसेना प्रमुख हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब ठाकरे यांचा आदर्श जोपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांची वाटचाल सुरू आहे. कोणत्याही पदाची लालसा न बाळगता जनतेचा सेवक म्हणून गरजवंतांच्या मदतीला धावून जाणे व निराधारांना आधार देणे, नागरिकांच्या अडअडची सोडविणे, गावागावात जाऊन तेथील समस्या जाणून घेऊन शासन व प्रशासन दरबारी समस्यांचा पाठपुरावा करणे, समस्या सोडविण्यास भाग पाडणे असे अनेक कार्य अरविंदभाऊ कात्रटवार करीत आहेत. सेवाभावाने केलेले कार्य आणि त्यापासून मिळणारा आनंद हा अनमोल असतो, हेच ‘ब्रिद’ जोपासून त्यांची वाटचाल सुरू आहे.

अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शिवसैनिकांना आपले कुटुंब मानून शिवसैनिक व त्यांच्या कुटुंबियांना संकट काळात आधार देण्याचे कार्य करीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर असोत अथवा शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी असोत प्रत्येक गरजवंतांच्या मदतीसाठी सेवाभाव जोपासून आधार देण्याचे काम अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, राष्ट्रवादी कॉग्रेस (श. प. गट) पक्षाचे नेते प्रकाश ताकसांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सतिश विधाते, माजी नगरसेवक गुलाबराव मडावी, यादवजी लोहंबरे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, दिलीप वलादे, स्वप्नील जुमनाके, विनोद चापले, अतुल जुमनाके, राजेंद्र खेडेकार, जयदेव मेश्राम, दिलीप आवारी, गुलाब शेरकी, गुरूदास कोडाप, महेश खेडकार, प्रफुल मेश्राम, साहिल कोसमशीले, दीपक कोसमशीले, भूषण शेरकी, हरिदास रामटेके, सुनील कोसमशीले, मनोहर कोसमशीले, पुरुषोत्तम आवारी, राजेंद्र मेश्राम, पुरुषोत्तम कुमरे, नवनाथ नरुले, मयूर मेश्राम, आशिष निकुरे, जीवन उसेंडी, रामू सलामे, अमित आवारी, यादव चौधरी, मुखरू मलोडे, जीवन कुरुडकर, देवेंद्र वलादे, अमित हुलके, अजय सेलोटे, आशिष शेडमाके, गिरीष टेकाम, सचिन मडावी, मधुकर बावणे, सूरज वलादे, गंधर्व वलादे, वामन नैताम, दीपक लाडे, ओमारी भैसारे, राहुल सावरकर, अक्षय ठावरे, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, आकाश मुंडरे, आशिष मुरतेली, साहिल निकुरे, त्रिशूल ठाकरे, प्रकाश भजभुजे, अक्षय समर्थ, आकाश मडावी, एकनाथ वाळके, अजय राऊत, राकेश वाघाडे, अमित चौधरी, प्रशांत पेंद्राम, युजीन चौधरी, गुणेश गुंटीवार, खुशाल कारेते, शुभम चंद्रगिरे, सचिन चौधरी, आरिफ ढवळे, साहिल कारेते, गौरव घुबडे, स्वप्नील मांडवकर, विलास ढोलणे, प्रणय सोरते आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.







