Home गडचिरोली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

75
Oplus_16908288

– आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणिवेचा संकल्प या उपक्रमाअंतर्गत नवेगाव (ता. गडचिरोली) येथील मूकबधिर निवासी विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात हातभार लागणार आहे.

यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, अविनाश महाजन, कीर्तिकुमारजी मासुरकर, हरिश माकडे, निखिलजी सुंदरकर, अमोल गंधमवार, मंगेश मामूलकर, रोशन सांगिडवार, यश मल्लेलवार आदींची उपस्थिती होते.

error: Content is protected !!