– गाव तिथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या विविध पदावर नियुक्ती सुरू
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जलद संघटना बांधणी कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील विविध क्षेत्रामधून अनेक नागरिक, प्रतिष्ठित मान्यवर, युवक युवती व स्वच्छ प्रतिमेचे काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये विविध पदावर नियुक्ती देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील वडसा येथील रहिवासी बाळकृष्ण माडुरवार यांची नियुक्ती राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी करण्यात आलेली आहे. याआधी बाळकृष्ण माडुरवार वनविभागात कार्य करत होते व त्यांनी दुर्गा उत्सव मंडळ व विठ्ठल रुक्मिणी मंदिर निर्माण कार्यामध्ये व विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन अनेक सामाजिक कार्य केले आहेत. तसेच त्यांनी वनकर्मचारी सहकारी पतसंस्था अध्यक्षपद सुद्धा भूषवलेले आहे. याची दखल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने घेतली व तात्काळ त्यांना संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, राहुल झोडे, राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद विश्वास, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा पौर्णिमा विश्वास, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सोदोंरकर, विदर्भ अध्यक्ष जावेद सैय्यद, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनीषा मडावी, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा सचिव प्रकाश थुल, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, नानु उपाध्ये, वडसा तालुका अध्यक्ष रजनीकांत गुरनुले, चामोर्शी तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, कुरखेडा तालुका अध्यक्षा रुपाली कावळे, अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी यांनी केली आहे,







