– नेतृत्व प्रेरणादायी कार्यकर्त्यांचा गौरव आणि शुभेच्छा सोहळा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भाजपच्या संघटनात्मक बळकटीसाठी झटणाऱ्या आणि समाजकार्यात नेहमीच पुढे असलेल्या दोन कर्तृत्ववान महिला कार्यकर्त्यांना माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. डॉ. अशोकजी नेते यांनी वाढदिवसानिमित्त शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे प्रत्यक्ष भेट देत पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई प्रमोदजी पिपरे तसेच माजी नगरसेविका लताताई लाटकर ह्या दोघींनी भाजप संघटनेच्या जडणघडणीत व सामाजिक चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी प्रशंसा केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“आपल्या जीवनात सदैव सुख, समाधान, उत्तम आरोग्य व यश नांदो. समाजकार्यातील आपला उत्साह व प्रेरणा सतत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राहो,” अशा शब्दात मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी योगिताताई पिपरे व लताताई लाटकर यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित कार्यकर्त्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, नगरसेवक आशिष पिपरे, विवेक बैस, देवाजी लाटकर, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, पुनम हेमके, सुनिता मडावी, शिल्पा लाटकर, अर्चना चन्नावार, बच्चन, श्याम वाढई, विनोद देवोजवार, सलीम शेख, उराडे यांच्यासह महिला आघाडीच्या नेत्या, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





