विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार व आदिवासींचे हृदयस्थान राज्याचे माजी राज्यमंत्री कै. बाबुरावजी मडावी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडचिरोली येथे विनम्र श्रद्धांजली अभिवादन करण्यात आले.
यावेळी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आदिवासी नेते घनश्यामजी मडावी, आदिवासी नेते माधवरावजी गावड, माजी नगरसेवक गुलाबजी मडावी, शहराध्यक्ष सतीश विधाते, प्रकाशजी ताकसांडे, माधुरीताई मडावी, अमोल कुळमेथे, उत्तमजी गेडाम, शिवराम कुमरे, मारोतराव इचोडकर, विनायक कोडापे, गंगाधर मडावी, विठ्ठलराव गेडाम, बादल मडावी, सुधीर मसराम, वर्षाताई शेडमाके, मनिषाताई मडावी, लक्ष्मीताई कन्नाके, आरतीताई कंगाले, तनुजाताई कुमरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.







