Home गडचिरोली दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन

125

– कारवाफा आश्रमशाळेत निरोप समारंभ

विदर्भ क्रांती न्यूज l

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे राज्य मंडळाच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी निरोप समारंभात परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विष्णू चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई. ठाकूर, माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, व्ही. एस. देसू, प्राथमिक शिक्षक आय. एम. कुमरे, संगणक शिक्षक स्वप्निल राठोड, क्रीडा शिक्षक अभय कांबळे उपस्थित होते.

यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त तसेच भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे. नियमित अभ्यास करून आपल्या जीवनातील मोठे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावे. महापुरुषांच्या व अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. आयुष्यातील चढ-उताराला सामोरे जाण्याची शक्ती आपल्या अंगी निर्माण करावी. निर्व्यसनी जीवन जगावे व चांगले नागरिक म्हणून घडावे असे आवाहन सुधीर शेंडे यांच्यासह उपस्थित शिक्षकांनी केले.

विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देताना शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनी भावूक झाल्या. बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी समई सप्रेम भेट दिली. यावेळी उच्च माध्यमिक शिक्षक टी. ए. आस्कर, पद्मावती महेशगौरी, माध्यमिक शिक्षिका वर्षा मस्के, पदवीधर प्राथमिक शिक्षिका चंदा कोरचा, प्राथमिक शिक्षक व्ही. एम. नैताम, कविता बारसागडे, संगीता पुराम, अधीक्षक गजानन सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, करिष्मा गोवर्धन, योगेश उसेंडी, सुनिता दुर्कीवार, संगीता करंगामी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी अर्पिता आतला हिने केले. वर्ग नववीची विद्यार्थिनी मनीषा वड्डे हिने आभार प्रदर्शन केले.

error: Content is protected !!