Home गडचिरोली इंदिरानगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंती उत्साहात साजरी

इंदिरानगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंती उत्साहात साजरी

173

– इंदिरानगर येथील मुख्य मार्गाने काढली रॅली

– चिमुकल्यांनी साकारली सावित्रीबाई व ज्योतिबांची वेशभूषा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शहरातील इंदिरानगर वार्डात शुक्रवार, ३ जानेवारी २०२५ रोजी तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगर व रमाई महिला मंडळ इंदिरानगर यांच्या सयुंक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व मेणबती प्रज्वलीत करून झाली. त्यानंतर सामुहिक बुध्दवंदना उपस्थितांनी ग्रहण केली.

इंदिरानगर येथील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिलांचे लेझीम पथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. रॅलीमधे छोट्या मुली व मुले क्रांतीज्योती सावित्रीबाईं व क्रांतीबा ज्योतीराव फुले यांची वेशभुषा करून सहभागी झालेले होते.

यावेळी आयोजित कार्यक्रमात किरण उराडे, राजरत्न पेटकर, निधी थोरात, अपेक्षा बांबोळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपआपले विचार व्यक्त केले. काही महिलांनी गीतगायन केले. तसेच मुलींनी नृत्य सादर केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन भाग्यश्री नंदेश्वर यांनी केले. यावेळी इंदिरानगर येथील जनता मोठ्या संख्येने उपास्थित होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाई महिला मंडळ इंदिरानगरच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!