विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : कै. बाबुराव मडावी स्मारक समिती, ऑल इंडिया आदिवासी अलाईन फेडरेशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व सर्व आदिवासी सामाजिक संघटना गडचिरोली यांच्यावतीने आयोजित आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान व गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार माजी राज्यमंत्री कै. बाबुरावजी मडावी यांचा ९७ व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कै. बाबुरावजी मडावी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नवनियुक्त आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुलाबराव मडावी, माधुरी मडावी, शिवरामजी कुमरे, डॉ. हेमराज मसराम, डॉ. राकेश चांदेकर, विनोद मडावी, उमेश उईके, अमर गेडाम, प्रकाश ताकसांडे, वनीश्याम येरमे मंचावर उपस्थित होते.







