मा. खा. अशोकजी नेते यांचे नेतृत्व आणि बंगाली समाजाचे सहकार्य ठरले निर्णायक विजयी

11

– बंगाली समाजाच्या वतीने मा. खा. नेते यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शानदार विजय मिळवत भाजपाच्या यशाचा झेंडा फडकवला. या विजयामागे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांचे नेतृत्व व बंगाली समाजाचे अमूल्य सहकार्य निर्णायक ठरले.

आज २८ नोव्हेंबर २०२४ रोजी गडचिरोली येथील अशोकजी नेते यांच्या निवासी जनसंपर्क कार्यालयात बंगाली समाजाच्या वतीने माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांचे बंगाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आकोलीताई विश्वास यांच्यासह सरपंच महिला व बंगाली समाजाचे स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंगाली समाजाचा ठसा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अशोकजी नेते यांनी चामोर्शी तालुक्यातील बंगाली गावांमध्ये सभा घेत भाजपाचा प्रचार केला. यामुळे बंगाली समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला, ज्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग सुलभ केला. “बंगाली समाजाच्या योगदानामुळे हा विजय अधिक सुकर झाला,” बंगाली समाजाचे प्रश्न व समाजाच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मा. खा. नेते यांनी यावेळी अभिनंदन स्वीकारत व्यक्त केले.

पुढे आपले मत व्यक्त करत अशोकजी नेते म्हणाले की, गडचिरोलीतील विजय हा भाजपाच्या संघटनशक्ती, नेतृत्व आणि जनतेच्या विश्वासाचा प्रतीक आहे. या विजयाने पक्षाला नव्या उंचीवर नेले असून कार्यकर्त्यांना अधिक आत्मविश्वास दिला आहे. गडचिरोलीतील हा विजय भाजपा आणि जनतेच्या विश्वासाला नवी ऊर्जा देणारा ठरला आहे. याप्रसंगी मा. खा. नेते यांनी जनतेचे व भाजपा महायुतीतील पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले.